महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे : जम्बो कोविड सेंटरमध्ये गलथान कारभार, पत्रकार रायकर यांच्या बहिणीचा आरोप - pandurang raykar death news

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील नोंद वहीतील नोंद व रुग्णांच्या खाटांचे क्रमांक यामध्ये तफावत आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी जम्बो कोविड सेंटरच्या गेटवर दिलेले जेवणाचे डबे व औषधे रुग्णांपर्यंत पोहोचत नसल्याने या कोविड सेंटरचा गलथान कारभार उघडकीस आला आहे.

जम्बो कोविड सेंटर पुणे
जम्बो कोविड सेंटर

By

Published : Sep 2, 2020, 7:56 PM IST

Updated : Sep 2, 2020, 10:43 PM IST

पुणे - पुण्यातील सीओईपी मैदानावर उभारलेल्या बहुचर्चित जम्बो कोविड केअर सेंटरचे मोठ्या धडाक्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पण, मोठा गाजावाजा झालेल्या या कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी आवश्यक सुविधा नसल्याचेच भयानक वास्तव समोर आले आहे. इतकेच नाही तर रुग्णांना नातेवाईकांनी दिलेला जेवणाचा डबाही रुग्णांपर्यंत पोहोचत नसल्याने जम्बो कोविड सेंटरचा गलथान कारभार समोर आला आहे.

बोलताना मनीषा शेंडगे

पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोरोना झाला होता. त्यांना सीओईपी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल केले गेले. मात्र, ऑक्सिजनची कमतरता भासत असलेल्या रायकर यांना या सेंटरमध्ये योग्य उपचार मिळाले नाही. भुकेले असलेल्या पांडुरंग यांच्यासाठी सकाळी कोविड सेंटरच्या गेटवर नातेवाईकांनी दिलेला डबा संध्याकाळपर्यंत त्यांच्याजवळ पोहोचू शकला नव्हता. तसेच त्यांना दिलेली औषधेही त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही.

कोविड सेंटरच्या रजिस्टरवर नोंदणी केलेला नंबर आणि रायकर यांच्या खाटावरील वेगळे होते. त्यामुळे त्यांच्यापर्यंत जेवण, औषधे पोहोचलीच नाहीत, असे पांडुरंग रायकर यांच्या बहिणीने सांगितले. इतका गलथान कारभार या सेंटरवर सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या सेंटरमध्ये कार्डीयाक रुग्णवाहीका उपलब्ध नाही. व्हेंटिलेटरही याठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे जम्बो सेंटर नक्की कशासाठी उभारले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा -पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये अतिक्रमण विभागाच्या गाडीतून आणले व्हेंटिलेटर

Last Updated : Sep 2, 2020, 10:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details