पुणे- कोरोना महामारीच्या काळात सामान्य रुग्णांसाठी राज्यातील डॉक्टरांनी त्यांचे क्लिनिक सुरू करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत भोरमधील सर्व डॉक्टरांनी एकत्र येत एस. टी. बस डेपो येथे निर्जंतुकीकरण करून मोफत फ्ल्यू बाह्यरुग्ण सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये २८ डॉक्टर काम करत आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळू सर्व रुग्णांना तपासले जात आहे. त्यामुळे या डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
अनेक डॉक्टरांनी एकत्र येऊन चालू केली रुग्णसेवा, भोरच्या एसटी डेपोत उभारला फ्ल्यू बाह्यरुग्ण विभाग
सर्दी, खोकला आणि इतर आजारासाठी शहरात आपआपल्या ओळखीच्या डॉक्टरांकडे येतात. त्यांच्याकडून औषधे घेतात. त्यामुळे कोरोनाचा संक्रमण होऊ नये यासाठी बाह्यरुग्ण विभाग मोफत सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी दिली. या बाह्यरुग्णा विभागात 28 डॉक्टर एकत्र येऊन काम करत आहेत.
देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू केले. त्यात काही खासगी डॉक्टरांनी त्यांचे क्लिनिक बंद केले होते. त्यामुळे साधा फ्लू झालेले रुग्ण शासकीय रुग्णालयात धाव घेतात. त्यामधून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता होती. त्यामुळे भोर तालुका मेडीकल असोसिएशन, भोर तालुका तहसील कार्यालय, पंचायत समिती भोर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत फ्लू बाह्यरुग्ण सेवा सुरू करण्यात आली आहे. अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या भोर एस. टी. डेपोत लोक प्रवासासाठी नाही, तर उपचारासाठी येत आहेत. एकाच ठिकाणी सर्वच डॉक्टर एकत्र आल्याने नागरिकांनी कसलीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.