पुणे- पहिल्या सोमवारी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर मंदिरात पहाटेची पूजा झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. देशभरातून आलेले भाविक मोठ्या भक्तिभावाने शिवलिंगाचे दर्शन घेऊन आपली बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण करत आहेत.
पहिल्या सोमवारी भीमाशंकरात भक्तिमय वातावरणात शिवलिंगाचे दर्शन सुरू
पहिल्या सोमवारी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर मंदिरात पहाटेची पूजा झाल्यानंतर भाविकांसाठी मंदीर खुले करण्यात आले आहे.
आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. श्रावणाची यात्रा ही आजपासून सुरू झाली आहे. दिवसभरामध्ये ३ वेळा आरती केली जाते. भीमाशंकर येथील शिवलिंग हे माता पार्वती व शिव शंकराचे एकत्रीत रूप असल्याने या ठिकाणी महिला व पुरुष हे दोघेही थेट शिवलिंगाचे दर्शन घेतात. आजपासून सुरू झालेली ही श्रावण मासातील यात्रा मोठ्या भक्तिभावाने नयनरम्य वातावरणात पार पडते.
भीमाशंकर हा परिसर अभयारण्यात येत असल्याने याठिकाणी येणाऱ्या भाविकांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी देवस्थान प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भीमाशंकर येथे काही प्रमाणात पाऊस होत असून भाविकही या थंड वातावरणात पावसाचाही मनमोहक आनंद घेत आहेत.