बारामती (पुणे जिल्हा)- भोंदुबाबाच्या (mantrik physically assaulted woman) सल्ल्याने महिलेला विवस्त्र करुन अघोरी कृत्य केल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील (baramati taluka) करंजेपूल येथे सासरच्या चौघांसह भोंदुबाबा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नात हुंडा जास्त दिला नसल्याने महिलेची सासू आणि दोन दीर सातत्याने छळ करत होते, असा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे. लग्न झाल्यानंतर लगेच छळ सुरु झाल्याचेही या महिलेने सांगितले आहे. त्यात भरीस भर म्हणून या महिलेला भूतबाधा झाल्याचे सांगून सासू आणि दोन दिरांनी एका मांत्रिकाला घरी आणले. त्याने पीडितेला उपाशी ठेवण्यास सुरवात केली. तसेच लिंबू उतरणे, अंगारे-धुपारे टाकणे, भस्म लावणे, अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग आदी गैरप्रकार सुरु केले.