पुणे- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला नुकतीच शमी-मंदार माळ अर्पण करण्यात आली असून प्रत्येक मण्याला सुवर्णसाज चढविण्यात आला आहे. यासाठी एकूण ८५ तोळे सोने वापरण्यात आले आहे. या माळीसाठी श्री क्षेत्र मोरगाव येथून शमी व मंदारच्या काष्ठा आणण्यात आल्या आहेत. मंदिरामध्ये विश्वस्तांच्या उपस्थितीत विधीवत पूजन करtन श्रीगणेश मूर्तीला ही माळ घालण्यात आली. या माळीत सुमारे १०८ मणी आणि २ हजार ८५० खड्यांची कलाकुसर तसेच ८५ तोळे सोन्याचा सुवर्णसाज करण्यात आला आहे. ही माळ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने वाहण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ८५ तोळे सोन्याची माळ अर्पण - पी.एन.जी. ज्वेलर्स
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला नुकतीच शमी-मंदार माळ अर्पण करण्यात आली. यासाठी एकूण ८५ तोळे सोने वापरण्यात आले आहे. पी.एन.जी. ज्वेलर्स यांच्याकडून ही माळ तयार करुन घेण्यात आली आहे. ही माळ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने तयार करण्यात आली आहे.
पी.एन.जी. ज्वेलर्स यांच्याकडून ही माळ तयार करुन घेण्यात आली आहे. शमी-मंदाराच्या झाडाच्या लाकडापासून साकारण्यात आलेले मणी या माळांमध्ये लावण्यात आले आहेत. मुख्य मूर्तीला मोठी व पूजेच्या चांदीच्या मूर्तीला लहान अशा दोन माळा तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक माळेमध्ये १०८ मणी व १ मेरु मणी लावण्यात आला आहे. याशिवाय सुमारे २ हजार ८५० पांढऱ्या खड्यांच्या कलाकुसर देखील करण्यात आली आहे. कारागिर राजू वाडेकर यांनी सलग १५ दिवस काम करत मणी घडविले आहेत. तसेच त्या माळेला पी.एन.जी.ज्वेलर्सच्या कारागिरांनी सुवर्णसाज चढविला आहे.