पुणे :Manchar Bhagwan Topi: पुणे जिल्ह्यातील मंचर हे गाव सध्या वेगळ्या व्यवसायाने चर्चेत आहे. मंचर गावातील भगवान टोपी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पसंतीला उतरली आहे. भगवान टोपीची बाजारात मोठ्या प्रमामावर मागणी आहे. वडिलांनी सुरु केलेला व्यवसाय मुलाने मोठ करत मंचरच्या अर्थकरणाराला गती देण्याचं काम भुते कुटुंबाने केले आहे.
या टोपीची युवक, जेष्ठ नागरिकांसह राजकारण्यांना देखील भुरळ पडली आहे.
जगभरात पोहचली टोपीची ओळख : आंबेगाव तालुक्यात मंचर गावात तयार होणारी भगवान टोपी तिला मंचर टोपी म्हणून देखील ओळखले जाते. आज या टोपीची ओळख जगभरात पोहचली आहे. टोपीला प्रत्येक शुभकार्यात वापरले जाते. त्यामुळे तिचे अनन्यसाधारण असे माहत्व आहे. जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे भगवान भुते हे चाळीस वर्षांपूर्वी पुण्यात आले होते. त्यांनंतर त्यांनी छोट्या प्रमाणावर कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्ण करण्याकरिता टोपी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला.
टोपिला 'भगवान टोपी' नाव : कॉटन कापडाला खळ लावून ती टोपी एकदम कडक पद्धतीने इस्त्री करून ते बाजारात विकू लागले. हळूहळू त्या टोपीला मागणी वाढू लागली. त्यानंतर भगवान यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा अरुण भगवान भुते यांनी हा व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांनी हा व्यवसाय वाढवला. त्यांनी या टोपीला आपल्या वडिलांचे नाव "भगवान टोपी " ( Bhagwan Topi ) दिले. तेव्हापासून या टोपीला भगवान टोपी म्हंटले जाते. पुढे पुढे या टोपीला मंचर टोपी देखील संबोधले जाऊ लागले.
अनेकांना रोजगार उपलब्ध : भुते यांच्या या टोपीच्या व्यवसायातून 40 ते 50 महिलांना आणि 25 पेक्षा ज्यास्त पुरुषांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या टोपीसाठी कॉटनचे कापड वापरले जाते. साधारण ही एक टोपी पूर्णपणे बनवायला ५ मिनिटांचा कालावधी लागतो. ४० ते ५० महिलांना यातून रोजगार उपलब्ध झाला आहे. त्याच बरोबर एका दिवसात जवळपास 3 ते 4 हजार टोप्या तयार केल्या जातात. बाजारात या टोपीची किंमत 15 , 20 , 25 आणि 35 रुपये आहे.
जगभरातून टोपीला मागणी : भुते यांच्या या टोपीला जगतभरतून मागणी वाढत आहे. प्रत्येक गावात भगवान टोपी वापरली जाते. या टोपीत पांढरी, गोल्डन आणि भगवी टोपी असे प्रकार आहेत. लग्न कार्यात या टोपीला विशेष मागणी असते. दररोज साडे तीन ते चार हजार टोपी शिवल्या जातात. त्यामुळे मंचर शहारत तयार होणारी ही टोपी जरी असली तरी तिला जगभरातून मागणी वाढली आहे. एवढंच नाही तर अरुण भुते यांनी ही कला अनेकांना शिकवली असून त्यांनी स्वतच्या व्यवसाय सुरू करून कुटुंबासाठी हातभार लावत आहेत. अरुण भुते यांनी वडिलांच्या नावाने सुरू केलेली "भगवान टोपी" ची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच असल्याचे पहायला मिळत आहे.