पुणे :आजपर्यंत आपण सुनेने सासरला कंटाळून आत्महत्या केलेले ऐकले असेल. पुण्यात मात्र वेगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरचे लोक त्रास देत असल्याने एका 38 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली ( Man Tired In Laws Torture suicide ) आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ( Complaint lodged at Khadki Police Station ) आहे.
गळफास घेत संपवले :पत्नी तसेच सासरच्या लोकांकडून सारखा त्रास देण्यात असल्याने समीर नाईक यांनी गळफास घेत जीवन संपवले ( Committed suicide by hanging ) आहे. नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नी उषा, सासू, सासरे, मामा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर यांचे वडील निवृत्ती भगवंत नाईक (वय ६५, रा. चांभुर्डी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.