पुणे- किरकोळ वादातून 18 वर्षीय तरुणाने आपली होणारी पत्नी आणि तिच्या आईवर चाकूने सपासप वार केले. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला तर, मुलीची आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या गणेश पेठ परिसरात घडली.
नाझनीन सादिक शेख ( वय 18) असे मृत मुलीचे नाव आहे. तर हमीदा सादिक शेख ( वय 45) असे जखमी आईचे नाव आहे. आरोपी शरीफ रझाक शेख ( वय 18) याला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.