पुणे- इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात रात्रीच्या सुमाराम एक भाविक वाहून गेल्याची घटना घडली होती. मात्र "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीचा या घटनेतून प्रत्यय आला. पाण्यात वाहून गेलेला व्यक्ती रात्रभर घाटावर असणाऱ्या एका समाधीला अडकून पाण्यातच बसला. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला वाचविण्यात यश आले.
"देव तारी त्याला कोण मारी"; देवाच्या आळंदीत इंद्रायणीच्या पाण्यात वारकरी रात्रभर राहूनही वाचला...
संजय इंद्रायणीच्या पुरात वाहून गेले होते. मात्र, नदीच्या घाटावरील समाधीला अडकून बसल्याने त्यांचा जीव वाचला.
संजय कांदरकर असे पुरात वहालेल्या व्यक्तीचे नाव आहे. माऊलींच्या दारात भक्ताला भीती नाही, असे प्रत्येक वारकरी सांगत असतात. त्याचे उत्तम उदाहरण आज लोकांपूढे आले. संजय इंद्रायणीच्या पुरात वाहून गेले होते. मात्र, नदीच्या घाटावरील समाधीला अडकून बसल्याने त्यांचा जीव वाचला. यावेळी घटनेत बचावलेल्या संजय कांदरकर यांनी ही माऊलींची कृपा असल्याचे सांगत जीव वाचविल्याबद्दल स्थानिकांचे आभार मानले.
देवाच्या आळंदीत आषाढी वारीवरुन संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपूरवरुन आळंदी नगरीत दाखल होते. यावेळी वारकरी देवाच्या नगरीत माऊलींच्या स्वागतासाठी येत असतात. मात्र दोन दिवसांपासून इंद्रायणी नदीला महापूर आल्याने वारकरी व भाविकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.