महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भोरमध्ये वीज पडून युवकाचा मृत्यू - Man dies in bhor

जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात वीज पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोर तालुक्यातील भोंगवली गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

man death
भोरमध्ये वीज पडून युवकाचा मृत्यू

By

Published : Oct 10, 2020, 10:13 PM IST

पुणे - जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात वीज पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोर तालुक्यातील भोंगवली गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. विकास शिंदे असे तरुणाचे नाव आहे.

विकास दुचाकीवरून घरी जात असताना प्राथमिक दवाखान्यासमोरच विकास यांच्या अंगावर वीज पडली. विकास शिंदे हे भोंगवली प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहन चालक म्हणून काम करत होते. शनिवारी सायंकाळपासून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस आणि विजेचा कडकडाट सुरू होता. त्या दरम्यानच ही घटना घडली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details