पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात लग्नाचे अमिष दाखवून तुझा आणि मुलाचा सांभाळ करतो असा विश्वास संपादन करून विवाहित महिलेशी शारीरिक संबंध ठेवले. तिच्याकडून, 5 लाख 50 हजार रुपये आणि 14 ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या घेतल्याही घेतल्या. या घटनेप्रकरणी 45 वर्षीय पीडित महिलेने वाकड पोलिसात तक्रार दिली असून आरोपी विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव बंडू पारखी (रा. काळाखडक, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. मात्र, अद्याप आरोपीला अटक नाही, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे.
तुझी अन् मुलांची जबाबदारी घेतो सांगून महिलेवर अत्याचार, वाकड पोलिसात गुन्हा दाखल - Wakad Police station Pune News
तुझी अन मुलांची जबाबदारी घेतो म्हणत लग्नाचे आमिष दाखवत नामदेव पारखी या व्यक्तीने महिलेची पिळवणूक केली. तिच्याकडून साडेपाच लाख रुपये आणि 14 ग्रॅम सोन्याच्या अंगठ्याही घेतल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार दिली असून आरोपी विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 45 वर्षीय महिला आणि आरोपी हे दोघेही विवाहित असून आरोपी नामदेव पारखी याने लग्नाचे अमिष दाखवत तुझी आणि तुझ्या मुलांची जबाबदारी घेईन. तुम्हाला व्यवस्थित सांभाळेन असे, आश्वासन देऊन पीडितेसोबत शहरातील विविध लॉजवर नेऊन अत्याचार केला. हा सर्व प्रकार 2011 पासून आजतागायत सुरू होता. दरम्यान, पीडित महिलेकडून आरोपीने 5 लाख 50 हजार आणि 14 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्याही घेतल्या मात्र, त्या परत केल्या नाहीत. आपली फसवणूक होत असल्याचे पीडितेच्या लक्षात येताच तिने या सर्व घटनेप्रकरणी वाकड पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी नामदेव विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडे करत आहेत.