दौंड (पुणे) -शहरातील गोवा गल्ली येथील दौंड-सिद्धटेक रस्त्यावरील लाकडाच्या वखारी जवळ गावठी हातभट्टीची तयार दारु घेऊन त्याची विक्री करत असताना एक व्यक्ती दौंड पोलिसांना आढळून आला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हातभट्टीची दारू विक्री
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब अशोक दळवी (वय 36 वर्षे, रा. मलठण, तालुका दौंड) हा गोवा गल्ली येथे बंदी असलेली हातभट्टीची दारु घेऊन फिरत असताना पोलिसांना आढळला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील दारू पोलिसांनी जप्त केली आहे. याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ईनुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -बारामती पोलिसांनी आवळल्या चोरांच्या मुसक्या, पाच दुचाक्या जप्त
हेही वाचा -पिंपरीत एअरहोस्टेस तरुणीला बेदम मारहाण करत केला बलात्कार