पुणे -बसची वाट पाहत थांबलेल्या महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका दुचाकीस्वाराने लैंगिक अत्याचार करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना समोर आली. मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. त्या प्रकरणाची तक्रार मिळताच पोलिसांनी जलद गतीने तपास करत 24 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. रामचंद्र बनसोडे असे या आरोपीचे नाव आहे.
मुंढव्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर लैंगिक अत्याचार; २४ तासात आरोपी अटकेत - मुंढवा लैंगिक अत्याचार अटक
महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका दुचाकीस्वाराने लैंगिक अत्याचार करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना समोर आली. मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. या प्रकरणी रामचंद्र बनसोडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित महिला फातिमानगर ते लोणी काळभोर या मार्गावर बसची वाट पाहत उभी होती. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपीने या महिलेला कुठे जायचे अशी विचारणा केली? महिलेने त्याला सांगितल्यानंतर मी सुद्धा लोणी काळभोरला चाललो आहे, असे सांगत तिला लिफ्ट दिली. त्यानंतर त्याने दुचाकी अज्ञात स्थळी नेऊन महिलेवर बलात्कार केला आणि तिच्या अंगावरील दागिने काढून पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीचे वय 50 ते 55 च्या दरम्यान असून त्याच्या दातावर काळा डाग असल्याची माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेत आरोपीचा शोध सुरू केला. महिलेने सांगितलेल्या वर्णनानुसार हडपसर परिसरातील काळेपडळ येथे राहणाऱ्या रामचंद्र बनसोडे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला 'तो मी नव्हेच' या अविर्भावात पोलिसांच्या प्रश्नाची उत्तरे देत होता. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबुल केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.