पुणे -पतीसोबत पायी निघालेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याची घटना बिबवेवाडी याठिकाणी घडली होती. या प्रकरणी एका चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विशाल अनिल भांडे (वय १९, रा. नीलकमल सोसायटी, बिबवेवाडी), असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकवणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली अशी घडली घटना -
फिर्यादी महिला 28 मार्चला पतीसमवेत बिबवेवाडीतील महेश सोसायटीजवळून पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ८७ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. हा सर्व प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बिबवेवाडी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेश ऊसगावकर, कर्मचारी अमोल शितोळे, राहुल कोठावळे यांनी या परिसरातील ३५ ते ४० सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासले. त्यानंतर ही चोरी विशाल भांडे याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्याकडून चोरीचे दागिने जप्त केले आहेत.