sexually Assaulting A Minor : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक - Half naked photos and videos
बारामती तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ (Half naked photos and videos) काढून बळजबरीने शारीरिक संबंध केल्याप्रकरणी एकावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Man arrested for sexually abusing a minor girl) करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने याबाबत तक्रार दिली होती.
बारामती:तकडोली येथिल प्रदिप बाळासो शिंदे याने एका अल्पवयीन मुलीचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ काढून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापीत केले या प्रकरणी त्याच्यावर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात त्याच्या पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारी नुसार. दि.11 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 च्या दरम्यान पीडित मुलगी शाळेत जात असता आरोपीने तीला मोटार सायकलवर बसवुन जेजुरी येथील लाँजवर नेले तीथे तीचे कपडे काढुन तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ काढले. तसेच बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्तापीत केले. याबाबत कोणास सांगीतले तर फोटो व व्हिडीओ सर्वांना पाठविल अशी धमकी दिली. या प्रकरणी प्रदीप शिंदे याच्या विरोधात भा.द.वि.कलम 363, 376,506 बाललैंगिक कायदा कलम 4,12 अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.