पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये विवाहित आत्याच्या मुलाने अल्पवयीन 16 वर्षीय मेहुणीवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. गंभीर बाब म्हणजे पीडित मुलगी 4 महिन्यांची गरोदर असल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने आरोपीविरोधात फिर्याद दिली असून 35 वर्षीय आरोपीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे.
संतापजनक..! विवाहित मामाचा अल्पवयीन भाचीवर बलात्कार; मामा जेरबंद - Physically abusing case in pune
पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याने आरोपीची पत्नी माहेरी निघून गेली. तेव्हा, आरोपी आणि पीडित अल्पवयीन भाची हे दोघेच घरी होते. पीडित मुलगी स्वयंपाक करत असताना जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी नणंदेकडे शिक्षणासाठी राहत होती. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नणंद आणि घरातील इतर सदस्य गावी गेले. मात्र, दहावीचा एक पेपर राहिला असल्याने पीडित मुलीची देखभाल करण्यासाठी 35 वर्षीय आरोपी मेहुणा आणि पत्नीला सांगितले होते. परंतु, पती पत्नीमध्ये भांडण झाल्याने आरोपीची पत्नी माहेरी निघून गेली. तेव्हा, आरोपी मेहुणा आणि पीडित अल्पवयीन मेहुणी हे दोघेच घरी होते. पीडित मुलगी स्वयंपाक करत असताना जीवे मारण्याची धमकी देत विवाहित आत्याच्या मुलाने बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार उशिरा उजेडात आला तेव्हा पीडित अल्पवयीन मुलगी 4 महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक न्यायमने यांनी सांगितले आहे. घटनेचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.