पुणे - आठवडाभरापासून वाहतुकीसाठी बंद असलेला माळशेज घाटातील ठाणे-नगर महामार्ग शुक्रवारी (९ऑगस्ट) दुपारपासून लहान वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. संततधार पावसाने माळशेज घाटातील रस्ता खचला होता. तसेच दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला होता.
माळशेट घाटातील वाहतूक धीम्या गतीने सुरू; अवजड वाहतुकीसाठी बंदी कायम - ठाणे-नगर महामार्ग
आठवडाभरापासून वाहतुकीसाठी बंद असलेला माळशेज घाटातील ठाणे-नगर महामार्ग आज (दि. ९ऑगस्ट) दुपारपासून लहान वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.

आठवडाभरापासून वाहतुकीसाठी बंद असलेला माळशेज घाटातील ठाणे-नगर महामार्ग आज (दि. ९ऑगस्ट) दुपारपासून लहान वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.
माळशेज घाटातील ठाणे-नगर महामार्ग लहान वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.
या महामार्गावरील दरड हटवण्याचे काम पूर्ण झाल्याने लहान वाहनांसाठी रस्ता खुला करण्यात आला असून, मोठ्या वाहनांना अद्यापही प्रशासनाने वाहतुकीची परवानगी दिली नाही. दरम्यान, माळशेज घाटातील महामार्ग खचल्याने अवजड वाहनांसाठी हा रस्ता पुढील काही दिवस बंद असणार आहे.