पुणे- वटपौर्णिमेच्या दिवशी राज्यातील अनेक महिला पुढचे सात जन्म हाच पती मिळावा यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाला फेऱ्या मारून सात जन्म हाच पती मिळावा अशी मनोकामना करतात. मात्र पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने, अनोख्या प्रथेला सुरुवात करण्यात आली. यावेळी पुरुषांनी वडाच्या झाडाची पूजा करून एक नवा पायंडा पाडून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
जन्मोजन्मी हिच बायको मिळू दे..! पुण्यात वटवृक्षाला पुरुषांनी मारल्या फेऱ्या... - वटपौर्णिमा साजरी
पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने, अनोख्या प्रथेला सुरुवात करण्यात आली. यावेळी पुरुषांनी वडाच्या झाडाची पूजा करून एक नवा पायंडा पाडून समाजासमोर आदर्श ठेवला.

पुरुषांनीही महिलांप्रमाणेच वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करत सात जन्म हिच पत्नी मिळावी, अशी मनोकामना केल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. महिलांद्वारेच वटपौर्णिमा साजरी करण्याच्या या परंपरेला पुण्यातील या पुरुषांनी छेद दिला आहे. पुढचे सात जन्म हाच पती मिळावा यासाठी जर महिला प्रार्थना करू शकतात तर पत्नीसाठी पुरुषही हे व्रत करू शकतात हे या पुरुषांनी दाखवून दिले आहे.
पुरुषांच्या या उपक्रमाचे महिलांनीही स्वागत केले आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. मग पुरुषानेही जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी मनोकामना केली तर वावगे ठरणार नसल्याचे या उपक्रमातून पुढे आले आहे.