महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालदीवच्या माजी उपराष्ट्रपतींना कर्करोगाची लक्षणे, पुण्यात होणार उपचार - maldiv

मालदीवमध्ये २८ सप्टेंबर २०१५ रोजी तेथील राष्ट्रपती यामीन अब्दुल गयूम यांच्या बोटीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर मालदीव सरकारने तत्कालीन उपराष्ट्रपती अहमद अदीब यांच्याविरुद्ध राष्ट्रपतींच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी खटला भरला आहे. त्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

मालदीवचे माजी उपराष्ट्रपती अहमद अदीब

By

Published : Jun 27, 2019, 9:30 PM IST

पुणे - मालदीवमध्ये बॉम्बस्फोटप्रकरणी खटला भरण्यात आलेले माजी उपराष्ट्रपती अहमद अदीब यांना दुर्धर आजाराची लक्षणे आहेत. त्यामुळे त्यांना पुण्यातील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय तपासण्या पूर्ण करण्यासाठी मालदीव सरकारने १० दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. अदीब यांनी आपल्याला डोळ्याचा ग्लोऊकोमा हा आजार असल्याचे तेथील सरकारला सांगितले.


मालदीवमध्ये २८ सप्टेंबर २०१५ रोजी तेथील राष्ट्रपती यामीन अब्दुल गयूम यांच्या बोटीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर मालदीव सरकारने तत्कालीन उपराष्ट्रपती अहमद अदीब यांच्याविरुद्ध राष्ट्रपतींच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी खटला भरला आहे. त्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मात्र, अहमद अदीब यांनी आपल्याला डोळ्याचा ग्लोऊकोमा हा आजार असल्याचे तेथील सरकारला सांगितले.


मालदीव सरकारने अहमद अदीब यांना १४ ते २६ जूनपर्यंत भारतात वैद्यकीय उपचारांसाठी जाण्याची परवानगी दिली होती. तसेच, भारत सरकारनेही त्यांना एका वर्षासाठी व्हिसा मंजूर केला आहे. त्यामुळे ते १४ जून रोजी त्यांच्या डोळ्यांच्या उपचारांसाठी भारत दौऱ्यावर आले आहेत. यासाठी मालदीवमधील संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने अहमद अदीब यांना एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करण्यासाठी तिकीट देखील उपलब्ध करून दिले होते.


दरम्यान, मालदीवचे माजी उपराष्ट्रपती अहमद अदीब यांनी मंगळवारी आपल्याला कर्करोग आणि अन्य काही महत्त्वाच्या वैद्यकीय तपासण्या करायच्या आहेत. त्यामुळे पुणे दौऱ्याची मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती मालदीव सरकारला केली होती. मालदीव सरकारने अहमद अदीब यांची विनंती मान्य केली आहे. मात्र, मालदीव सरकारच्या आदेशानुसार अहमद अदीब यांना मालदीवला परतणे बंधनकारक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details