पुणे - फळांचा राजा असलेला हापूस आंबा यावर्षी खूप लवकर पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात दाखल झाला आहे. पण हा हापूस कोकणातून नाही तर चक्क दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात दाखल झाला आहे. आधी मुंबईत आणि त्यानंतर पुण्यात या मालावी जातीच्या ५०० पेट्यांची आवक झाली आहे. या आंब्याला पुण्यात डझनमागे 1600 ते 1800 रुपये भाव मिळाला आहे. तर, या आंब्याचा हंगाम 15 डिसेंबरपर्यंत राहील, अशी माहिती आहे.
आंबा म्हटले की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. या फळाचा राज्याची चव चाखण्यासाठी नागरिक नेहमीच आतूरतेने वाट पाहत असतात. यातीलच, मालावी येथील हापूस आंबा हा पुण्यात दाखल झाला असून ग्राहकांकडून या आंब्याला चांगली मागणी येत आहे.