महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महावितरण'च्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करा; अन्यथा... - MSEDCL employees demand pune

आतापर्यंत 9 कंत्राटी कामगार काम करताना मृत्यूमुखी पडले आहेत. यावेळी 12 कामगार हे जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित सरकारकडून आर्थिक मदत मिळाली पाहिजे. कंत्राटदार हे कामगारांची आर्थिक पिळवणूक करतात. तक्रार करणाऱ्यांना कमी केले जाते. जे कामगार 10 ते 12 वर्षे कंत्राटी कामगार काम करतात त्यांना कायम स्वरूपी समाविष्ट करावे, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केली.

employees during agitation
आंदोलन करताना महावितरणचे कर्मचारी

By

Published : Jun 15, 2020, 7:35 PM IST

Updated : Jun 15, 2020, 8:24 PM IST

पुणे - राज्यात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या वीज उद्योग कंपनीत 20 हजार कंत्राटी कामगार काम करतात. या कामगारांना भरती प्रकिया रद्द करून कायम स्वरूपी सामावून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केली. या मागणीसाठी आज (सोमवारी) पुण्यातील महावितरणच्या प्रकाश भवन या मुख्य कार्यालयासह राज्यभरात वीज कंत्राटी कामगार संघाने आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी काळ्या फिती लावल्या होत्या.

'महावितरण'च्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करा; अन्यथा...

हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. राज्यातील सगळे कामगार काळ्या फिती लावून काम करणार आहेत. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी संघटना चार टप्प्यात आंदोलन करणार आहे. शेवटच्या चौथ्या टप्प्यात सात जुलै पासून राज्यातील तिन्ही कंपनीतील सर्व कामगार बेमुदत काम बंद आंदोलन करतील, असा इशारा संघटनेने दिला.

आतापर्यंत 9 कंत्राटी कामगार काम करताना मृत्यूमुखी पडले आहेत. तर 12 कामगार हे जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित सरकारकडून आर्थिक मदत मिळाली पाहिजे. कंत्राटदार हे कामगारांची आर्थिक पिळवणूक करतात. तक्रार करणाऱ्यांना कमी केले जाते. जे कामगार 10 ते 12 वर्षे कंत्राटी कामगार काम करतात त्यांना कायम स्वरूपी समाविष्ट करावे. भरती करू नये. तसेच याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंत कंत्राटदार विरहित रोजगार कामगारांना कंपनीने द्यावा, अशी मागणीही महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केली.

Last Updated : Jun 15, 2020, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details