बारामती -ज्येष्ठ नेते शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा ( Minister Nitin Gadkari ) ऊस साखर कारखानदारी मधील गाढा अभ्यास आहे. त्यांनी ऊसापासून साखर बनवण्याऐवजी थेट इथेनॉल तयार ( Make Ethanol From Sugar cane ) करा. त्यापासून परकीय चलन वाचवण्यात मदत होईल, असा सल्ला दिला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ( Dcm Ajit Pawar ) दिली. एकरी १०० टन ऊस उत्पादन अभियान शुभारंभ व शेतकरी मेळाव्याचे आयोजन शनिवार ( 7 मे ) माळेगाव इंजिनिअरींग कॉलेजच्या शरद सभागृहामध्ये करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, पावसाळा चांगला झाला, तर पुढील वर्षी ऊसाचे वजन चांगले भरेल. त्यामुळे कदाचित आम्हाला ऑक्टोबरमध्ये देखील ऊसाच्या गाळपासाठी परवानगी द्यावी लागेल. कारण, पुन्हा पुढील वर्षी मे महिना उजाडला तर मजुर थकुन जातो. तसेच, हार्वेस्टरला देखील मर्यादा आहेत. आम्ही पुन्हा हार्वेस्टरला अनुदान देण्याबाबत विचार करत आहोत.