पुणे -कोरोना महामारीमुळे वैद्यकीय उपचारावर रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्चाचा बोजा प्रत्येक व्यक्तीला सहन करावा लागत आहे. अशा नाजूक परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने राज्यात सर्व औषधे 'टॅक्स फ्री' करावीत व सर्वसामान्य नागरिकांना या संकटाच्या काळात दिलासा द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली.
माहिती देताना संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे हेही वाचा -लॉकडाऊनमध्ये गरजूंकरीता जय गणेश व्यासपीठातर्फे भोजनसेवा
संतोष शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात मनोरंजनासाठी चित्रपट टॅक्स फ्री केले जातात. याच धर्तीवर माणसे जिवंत ठेवण्यासाठी सध्याच्या महामारीत व आणीबाणी सदृश्य परिस्थितीमध्ये सर्व औषधे टॅक्स फ्री करणे गरजेचे वाटते. म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यात औषधे टॅक्स फ्री केली पाहिजेत. या मागणीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने विचार करावा व तत्काळ निर्णय घ्यावा व राज्यामध्ये तसे स्पष्ट जाहीर करावे ही नम्र विनंती. अन्यथा याबाबत संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करणार.
हेही वाचा -अफवांना बळी पडू नका; मासिक पाळीच्या काळातही कोरोना लस घेणं पूर्ण सुरक्षित..!