पुणे :पुणे जिल्ह्यातील एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बीएमसीसी रोड, शिवाजीनगर,नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या तिन्ही सीबीएससी या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच जे शासनाचे प्रमाणपत्र आहे. ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहेत. बारा लाख रुपयात बनावट एनओसी देणारी टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. ( bogus school cases in pune ) मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून दिले जाणारी एनओसी ही टोळी चक्क बारा लाख रुपयेमध्ये सिबीएसीच्या संस्था चालकांना देत असल्याचे समोर आले आहे.
फिर्यादींनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल :या प्रकरणी सुनंदा तुकाराम वाखारे वय 43 वर्ष काम नोकरी राहणार डी-206, इडन पार्क सोसायटी, गणपती चौकाजवळ, विमाननगर पुणे यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी सुनंदा तुकाराम वाखारे या माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद पुणे येथे शिक्षण अधिकारी म्हणून कर्तव्य करत आहेत. दिनांक 14 जुलै 2022 रोजीचे पुर्वी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद पुणे, पत्ता - जुनी जिल्हा परिषद इमारत, सोमवार पेठ, पुणे 11 च्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या 1) क्रिएटीव्ह एज्युकेशनल सोसायटी, पुणे संचलित पब्लिक स्कुल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, जिल्हा पुणे 2) एम.पी. इंटरनॅशनल स्कुल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, बी.एम.सी.सी. रोड, शिवाजीनगर जिल्हा पुणे व 3) एज्युकेशनल करिअर फाऊंडेशन नमो आर. आय. एम. एस. इंटरनॅशनल स्कुल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, जि. पुणे या स्कुल / ज्युनिअर कॉलेजला सी.बी.एस.ई बोर्डाशी / मंडळाशी ॲफिलेशन / संलग्न करण्याबाबतचे बोगस / बनावट ना-हरकत प्रमाणपत्र बनविले आहेत. अशी फिर्यादींनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (bogus school cases in pune )
विश्वासाला तडा जाईल असे काही मंडळींनी काम केले :राज्यात सध्या वाढत असलेले बोगस प्रमाणपत्रबाबत शिक्षण आयुक्त सुरज मांढरे म्हणाले की खरे तर शाळा अनाधिकृत असू शकते असे कोणालाच वाटू शकत नाही. पण त्या विश्वासाला तडा जाईल असे काही मंडळींनी काम केले आहे. आरटीई मधील तरतुदी अतिशय स्पष्ठ आहे की एखादी शाळा जर अनाधिकृत असेल तर त्याच्यावर दंडनीय कारवाई करण्यात येते. पर डे देखील कारवाई करण्यात येते आणि तशी कारवाई देखील करायला आम्ही सुरवात केली आहे.