पुणे -दौंडमधीलऔद्योगिक वसाहतीत स्थित शिवशक्ती केमिकल कंपनीमध्ये मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या आसपास भीषण आग लागली. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नामुळे सुमारे तीन ते चार तासांनंतर ही आग आटोक्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत मोठी आग...अग्निशमन दलाच्या तत्परतेने परिस्थिती आटोक्यात - कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत आगीचे सत्र सुरूच असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुण्याचा भौगोलिक विस्तार मोठा असल्याने औद्योगिक क्षेत्रही मोठे आहे. या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प आहे. अशा प्रकल्पांमध्ये याआधीही आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात याच एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीला आग लागली होती.
यंदा मे महिन्यातही कुरकुंभ एमआयडीसीत आग लागल्याचा प्रकार समोर आला होता. कुसुम डिस्टिलेशन अँड रिफायनरी या कंपनीत आग लागल्यानंतर केमिकल्सने भरलेले बॅरेल १०-१० मिनिटांनी फुटून त्याच्या आवाजाने परिसर दणाणला होता. तसेच हवेत आगीचे भयानक लोळ आणि काळा काळा धूर पसरले होते. आगीचे लोळ आणि धूर दहा ते पंधरा किलोमीटरवरून दिसत होते. तर, आगीचे भयानक स्वरुप पाहता परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी देखील पहाटेच्या वेळी आग लागली आहे.