पुणे :तु सुंदर दिसत नाही तु मला आवडत नाहीस तु वेडसर आहे. तुला मॉर्डन मुलीसारखे राहणे जमत नाही. तु लो स्टँडर्ड आहेस. जर्मनीमधील नोकर बायका तुझ्या पेक्षा चांगल्या आहेत. असे म्हणत पत्नीला हिणवणार्या पतीवर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन योगराज ग्रोवर (43, रा. सेरेनो पॅनकार्ड क्लब रोड, बाणेर सध्या रा. जर्मनी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 41 वर्षीय महिलेनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कौटुंबिक हिंसचार प्रकरणी गुन्हा दाखल :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह पवन ग्रोवर यांच्याशी झाला. सासरी दिल्ली आणि औंध येथे नांदत असताना तिचा कौटुंबिक छळ झाल्याचा प्रकार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पवनने त्याच्या पत्नीला तु सुंदर दिसत नाही, तु मला आवडत नाहीस, तु वेडसर आहे, तुला मॉर्डन मुलीसारखे राहणे जमत नाही, तु लो स्टँडर्ड आहेस. जर्मनीमधील नोकर बायका तुझ्या पेक्षा चांगल्या आहेत, असे म्हणत पत्नीला हिनवणार्या व माहेरी जाण्यास सांगितले. तसेच तूला पुर्णपणे बरबाद करून टाकेल अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. पतीवर धमकावणे व कौटुंबिक हिंसचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2006 पासून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.