महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागरिकांच्या आरोग्याची काळजी असणारे महाविकास आघाडी सरकार- उपमुख्यमंत्री - महाविकास आघाडी सरकार

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत 'माझा व्यवसाय माझा हक्क' या स्वयंरोजगाराची संधी निर्माण करुन देणाऱ्या उपक्रमाचा प्रारंभ आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गदिमा सभागृहात पार पडला.

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : Jan 31, 2021, 3:35 PM IST

बारामती- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मागील वर्षभरात कोरोना, अतिवृष्टी, चक्रीवादळ सारखी संकटे आली. त्यात कोरोनाच संकट मोठं आणि अभूतपूर्व होतं. सरकारचे आर्थिक नुकसान झालं तरी चालेल. मात्र लोकांचा जीव वाचला पाहिजे, या भावनेतून महाविकास आघाडी सरकार काम करत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत 'माझा व्यवसाय माझा हक्क' या स्वयंरोजगाराची संधी निर्माण करुन देणाऱ्या उपक्रमाचा प्रारंभ आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गदिमा सभागृहात पार पडला. यावेळी आमदार अशोक पवार व अतुल बेनके हे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.

सीएम फंडाला बँकांची मदत-

पवार म्हणाले की, कोरोना काळात पंतप्रधान कार्यालयाने सर्व कंपन्या व बँकांना सर्व सीएसआर पीएम रिलीफ फंडात आला पाहिजे, असे सांगितले. त्यामुळे आपल्याला अडचणी आल्या. टाटा कंपनीने तर दीड हजार कोटी रुपये पीएम रिलीफ फंडाला दिले. टाटाचा महत्त्वाचा प्रकल्प पिंपरी-चिंचवडला आहे. तसेच टाटा कंपनीचे आणि राज्याचे एक वेगळे नाते आहे. त्यामुळे सीएम रिलीफ फंडाला ही दोनशे कोटी रुपये देण्याचे सांगण्यात आले. मात्र यामध्ये विविध बँकांनी मदत केल्याचे पवार यांनी सांगितले.

पाच वर्षात एक लाख सुक्ष्म व लघु उपक्रम प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट- अजित पवार

माझा व्यवसाय माझा हक्क, या उपक्रमांतर्गत पाच वर्षात एक लाख सुक्ष्म व लघु उपक्रम प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. अर्थखाते आपल्याकडेच आहे. मात्र कोरोनाचे संकट असल्यामुळे निधीला मर्यादा आहेत. हे उद्दिष्ट आपण पार पाडायला यशस्वी झालो तर मोठ्या प्रमाणात राज्यातील कानाकोपऱ्यातील युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची वयोमर्यादा 18 ते 45 एवढी असून इतर प्रवर्गासाठी पन्नास वर्षांची मर्यादा आहे.

हेही वाचा-'एकीकडे गांधींना श्रद्धांजली तर दुसरीकडे सावरकर यांचीही पूजा', ओवैसींचा हल्लाबोल

हेही वाचा-मन की बात : '२६ जानेवारीला दिल्लीत तिरंग्याचा अपमान झाल्यामुळे संपूर्ण देश दु:खी'

ABOUT THE AUTHOR

...view details