पुणे: महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे आमदार म्हणून पुण्यातील वडगाव मध्ये फ्लेक्स लावण्यात आले आहे. रवींद्र धंगेकर आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन फ्लेक्स वर असा मजकूर यावर लावण्यात आला आहे. दोन तारखेला निकाल लागण्याआधीच उपनगरात फ्लेक्स बाजूला सुरुवात झाली आहे.
अनेक आरोप प्रत्यारोप:आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत राज्यातील सर्वच आजी-माजी मंत्री यांच्या सभा रॅली तसेच कोपरा मीटिंग घेण्यात आले होते निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटचं मतदान होण्यापर्यंत दोन्ही पक्षाकडून आरोप प्रत्यारोप होत होते.
सुरुवातीलाच नाराजी नाट्य:आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली आणि त्यानंतर सातत्याने कसबा पोट निवडणुकीत वेगवेगळे घटना पाहायला मिळाल्या. सूरवातीला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी बाबत झालेलं नाराजी नाट्य,त्यानंतर महा विकास आघाडीमध्ये झालेलं बंड हे देखील कसबा पोटनिडणुकीत बघायला मिळालं.
राज्यातील सर्वच नेते मंडळी कसब्यात:कसबा पोटनिवडणुकीत सुरवाती पासूनच प्रचारात स्थानिक मुद्दे बाजूला आणि राज्य तसेच देशातील राजकीय परिस्थिती वर चर्चा प्रामुख्याने बघायला मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात देखील माजी मुख्यमंत्री,माजी मंत्री तसेच महाविकास आघाडीतील सर्वच नेते मंडळी यांचं प्रचारात सक्रिय सहभाग पाहायला मिळालं.या सर्व नेते मंडळींकडून प्रचारात कसबा मतदार संघातील स्थानिक मुद्दे मांडण्यात आले.
खासदार गिरीश बापट यांचे महत्त्व:कसबा मतदारसंघ म्हटलं की खासदार गिरीश बापट यांचं नाव आलाच कारण गेल्या पाच वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट यांना कसब्यातील किंगमेकर अस म्हटल जाते.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार दिलीप पाटील यांची भेट घेतली आणि दुसऱ्याच दिवशी बापट प्रचाराला आले.बापट हे जरी हेमंत रासने यांच्या प्रचाराला आले असले तरी विरोधकांकडून भाजप वर जोरदार टिका करण्यात आली.
आरोपांनी गाजला निवडणूक प्रचार:कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून दोन्ही उमेदवाराकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले खासदार गिरीश बापट यांचा मुद्दा असेल किंवा काँग्रेसकडून बंडखोरीचा मुद्दा असेल असे अनेक प्रश्न या पोटनिवडणुकीत पाहायला मिळाले विशेष म्हणजे राज्यातील सत्ता संघर्ष आणि निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन हे देखील विषय याच पोटनिवडणुकीत पाहायला मिळाले.
हेही वाचा:MVA Slogans Outside BMC Office: मुंबई पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर '५० खोके, एकदम ओके'ची घोषणाबाजी