पुणे - महाशिवरात्री भगवान महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. या सृष्टी मधील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीचे दायित्व असलेल्या ईश्वरी शक्तीच्या स्मरणार्थ महाशिवरात्री साजरी केली जाते. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अशी ओळख असलेल्या भीमाशंकर मंदिर रात्रीपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीच्या एका प्रहरी भगवान शंकर विश्रांती घेतात. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात. त्यामुळे आजच्या महाशिवरात्रीच एक वेगळे महत्त्व असल्याने देशभरातून प्रत्येक भाविक शिवलिंगाचे दर्शन घेतात. भीमाशंकर लाडाकी नेम भीमाशंकर या नावानेही ओळखले जाते. त्रेतायुगातला शिव शंकराचा भक्त आणि वरदान मिळाल्याने उन्मत झालेल्या त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकराने अर्धनारीनटेश्वर रूप धारण करून त्रिपुरासुराचा वध केला. त्यानंतर शिव शंकराचे शिवलिंग भीमाशंकर या ठिकाणी स्थापन करण्यात आले. याच भीमाशंकर मधून भीमा नदीचा उगम झाला.