महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे पोलिसांनी केले साडेचार कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट - पुणे पोलीस लेटेस्ट न्यूज

पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त केलेले तब्बल साडेचार कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ मंगळवारी नष्ट करण्यात आले.

PUNE POLICE
पुणे पोलीस

By

Published : Mar 24, 2021, 4:00 PM IST

Updated : Mar 24, 2021, 6:31 PM IST

पुणे -पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त केलेले तब्बल साडेचार कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ मंगळवारी नष्ट करण्यात आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीच्या देखरेखीखाली हे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे हे या कमिटीचे अध्यक्ष होते.


हेही वाचा -युट्यूबवर आत्महत्या करण्याची माहिती घेत जावयाची सासुरवाडीत आत्महत्या


साडेचार कोटी रुपयाचा गांजा जप्त

या समितीने निर्णय घेतल्यानंतर तब्बल साडेचार कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनीच्या भट्टीत जाळून नष्ट केले आहेत.यामध्ये 655 किलो गांजा, 400 ग्रॅम चरस, 1 किलो 812 ग्रॅम कोकेन, 128 ग्रॅम मेफड्रोन, चार किलो 352 ग्रॅम ब्राऊन शुगर, 77 मिली एमफेटामाईन असा तब्बल साडेचार कोटी (4,46,33,660) रुपये किमतीचे हे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.

Last Updated : Mar 24, 2021, 6:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details