पुणे - काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचे वैयक्तिक मत मांडले आहे. मात्र, आम्ही थकलेलो नाही तर जोमाने उभे राहिलो आहोत आणि जोमाने निवडणुकीला सामोरे जात असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
या निवडणुकीमध्ये आघाडी 160 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करताना भाजपप्रमाणे अवास्तव बढाया आम्ही मारत नाही, आमच्या आहे त्या जागा डबल होतील एवढा विश्वास नक्की असल्याचे सांगत आघाडीचे सरकार राज्यात येईल, असा विश्वास थोरातांनी व्यक्त केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.