महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra State Police Sports Championship : महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा चॅम्पियनशिप स्पर्धा; 2,833 राज्य पोलीसांचा सहभाग, 18 खेळ - 2833 State Police participated in 18 games

वानवरी मैदानावर महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली ( Maharashtra State Police Sports Championship ) आहे. स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आयोजक यजमानांकडून उपाययोजना करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

Maharashtra State Police Sports Championship
महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा चॅम्पियनशिप स्पर्धा

By

Published : Jan 7, 2023, 10:07 AM IST

पुणे :महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा चॅम्पियनशिपची ( Maharashtra State Police Sports Championship ) सुरुवात गुरूवारी 11 जानेवारीपासून होणार आहे. वानवरीच्या राज्य राखीव पोलीस दलाचे मैदान 1 आणि 2 वर ही स्पर्धा होणार ( State Police Sports Championship Wanwari Ground ) आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत 2,833 राज्य पोलीस अधिकारी सहभागी होणार आहेत. 18 विविध खेळांमध्ये हे सर्व भाग ( 2833 State Police participated in 18 games ) घेतील.

18 खेळांचा समावेश : या स्पर्धेत कुस्ती, बॉक्सिंग, जलतरण, वेटलिफ्टिंग, बॉडीबिल्डिंग, मैदानी खेळ, फुटबॉलसह 18 खेळांचा समावेश ( 18 Games Included in Championship ) आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेले खेळाडू देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 33 व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान पुणे पोलिस आयुक्तालयाला मिळाला आहे.

स्पर्धा यशस्वीरित्या पारपडावी यासाठी उपाययोजना : “आयोजनक शहर म्हणून, पुणे पोलिसांनी स्पर्धा यशस्वीरित्या पारपडावी यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आणि प्रत्येक मिनिटाच्या तपशीलाची काळजी घेण्यात आली आहे,” असे पोलीस आयुक्त रितेश कुमार ( security conduct for competition ) म्हणाले. सर्व खेळाडू, पंच आणि इतर सपोर्ट कर्मचार्‍यांसाठी पुरेशी व्यवस्था केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील पोलीस अधिकारी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक पथक तयार करतील. पोलीस आयुक्त रितेश कुमार ( Commissioner of Police Ritesh Kumar ) यांनी सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ : 11 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या स्पर्धेचा अधिकृतपणे शुभारंभ करणार ( Eknath Shinde inaugurate tournament ) आहेत. 13 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा समारोप होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. त्याव्यतिरीक्त राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंग (IPS Anup Kumar Singh), पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Retesh Kumaarr) आणि सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी दिली. यावेळी अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), जालिंदर सुपेकर (IPS Jalinder Supekar), राजेंद्र डहाळे (IPS Rajendra Dahale) आणि राज्य राखीव पोलिस दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक दिपक साकोरे (IPS Deepak Sakore) स्पर्धेदरम्यान उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details