बारामती- बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम अनुकरणीय असून, राज्यातील बाजार समित्यांनी बारामती बाजार समितीला भेट द्यावी. त्याचे अनुकरण करावे, असे आव्हान महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक सतीश सोनी यांनी केले. सोनी आज बारामती दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी हित जोपासत शेतकऱ्यांना उपयुक्त असणारे विविध प्रकल्प राबवत असून, हे काम उल्लेखनीय आहे, असे मत सोनी यांनी व्यक्त केले आहे.
राज्यातील बाजार समित्यांनी बारामती बाजार समितीचे अनुकरण करावे; सतीश सोनी - बारामती बाजार समिती लेटेस्ट न्यूज
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी हित जोपासत शेतकऱ्यांना उपयुक्त असणारे विविध प्रकल्प राबवत असून, हे काम उल्लेखनीय आहे. राज्यातील बाजार समित्यांनी बारामती बाजार समितीला भेट देऊन त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन सोनी यांनी केले.
हेही वाचा-Antilia Explosives Scare : फॉरेन्सिक टीमकडून गाड्यांची तपासणी सुरु
बाजार समितीच्या उत्पन्नवाढीचे प्रकल्प...
बाजार समित्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी बाजार समितीच्या आवारात असणारे शेतीपूरक व्यवसायासाठीचे गाळे अधिकाधिक कसे वाढवता येतील. तसेच विजेची बचत करण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जा प्रकल्प राबवता येतील का, सीएनजी पंप, पेट्रोल पंप उभारणे, बाजार समितीकडे जर पैसे नसेल तर स्वारस्य अभिव्यक्ती राबून काही करता येईल का. यासंदर्भात विचारविनिमय सुरू असून लवकरच शासनामार्फत जाहीर केले जातील.अशी माहिती सोनी यांनी दिली.
बारामती हे महाराष्ट्रातील एक आदर्श व समृद्ध तालुका...
नियोजनबद्ध रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा झाडे, सर्वत्र स्वच्छता तसेच येथील नगरपालिकेची इमारत, प्रशासकीय भवन, आरटीओ कार्यालय अतिशय सुंदर असून त्याची देखभाल ही सुंदर ठेवली जात आहे. जिल्हा पातळीवरील सर्व सुविधा या ठिकाणी आहेत. बारामती हे महाराष्ट्रातील एक आदर्श व समृद्ध तालुका असल्याचे सोनी म्हणाले..
हेही वाचा-कोरोना वाढला! अंधेरी, बोरिवली, कांदिवली, मुलुंड कोरोनाचे 'हॉटस्पॉट'