महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशातील 64 टक्के लोक संघ परिवार अन् भाजपच्या विरोधात - डॉ. रत्नाकर महाजन - पिंपरी-चिंचवड काँग्रेस बातमी

जे सत्तर वर्षात घडले नाही ते या महिन्यात दसऱ्या दिवशी घडले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा हा रावण दहन म्हणून उत्तर भारतात जाळण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन म्हणाले.

dr. ratnakar mahajan
बोलताना डॉ. महाजन

By

Published : Oct 31, 2020, 7:40 PM IST

पुणे -देशातील 64 टक्के लोक हे संघ परिवार आणि भाजपच्या धोरणा विरोधात आहेत. देशातील 64 टक्के लोक ज्या पक्षाच्या विरोधात आहेत. तरीही पन्नास वर्षे सत्तेत राहू अशी वलगना तडीपार नेते करत आहे, असा निशाणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी भाजप आणि संघावर साधला आहे. तसेच जे सत्तर वर्षात घडले नाही ते या महिन्यात दसऱ्या दिवशी घडले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा हा रावण दहन म्हणून उत्तर भारतात जाळण्यात आल्याचेही ते म्हणाले.

बोलताना डॉ. रत्नाकर महाजन

ते पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आकुर्डी येथे ‘किसान अधिकार दिनानिमित्त’ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

महाजन म्हणाले की, पंतप्रधान निवडीपासून सर्व गोष्टींमध्ये संघांचा हस्तक्षेप आहे. भारतीय जनता पक्षात बाहेरून झालेली आयात वगळता मूळ भारतीय जनता पक्षाचे जी लोक आहेत. ते प्रथम संघाचे स्वयंसेवक आहेत आणि मग भाजपचे सदस्य. भाजपची अवस्था म्हणजे उदार उसनवारी चालणारा संसार, अशी आहे. त्यांनी अनेकांना आपल्या पक्षात घेतले. 2014 सालापासून त्यांच्यामध्ये बहूसंख्यांक वाद आणि त्यातून अहंकार निर्माण झाला. त्यामुळे बाकी सर्व कसपटा समान, देशभक्त केवळ आम्ही नागरिकांचा पाठिंबा आम्हालाच आहे, असे त्यांना वाटू लागले.

2014 साली भाजपला मिळालेल्या एकूण मताची टक्केवारी 33 टक्के होती. 2019 साली ती 36 टक्के झाली. त्याचा अर्थ आजही देशातील 64 टक्के लोक संघ परिवार, त्यांचा विचार, भारतीय जनता पक्षाचे धोरणाच्या विरोधात आहे.

हेही वाचा -'भाजपवर टीका करणे ही संजय राऊत यांची "ड्यूटी", शरद पवारच राज्य चालवतात केले मान्य'

ABOUT THE AUTHOR

...view details