पुणे :आज महाराष्ट्रात आणि देशात काही गटांकडून जाती-धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण केली जात आहे. सर्वसामान्य लोक अशा प्रवृत्तीच्या लोकांना जागा दाखविणार आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शऱद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. ते साताऱ्यात यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलै 2023 रोजी आणखी एक बंड पाहायला मिळाले. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप घडवला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा रान उठवणार आहेत. शरद पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा आशीर्वाद घेऊन ते लढाईचे रणशिंग फुंकणार आहेत. स्वत: शरद पवार यांनी या दौऱ्याची माहिती रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती.
साताऱ्यात शक्तीप्रदर्शन करणार : शरद पवार आज सकाळी मोतीबागेतून निघाले होते. ते आज सातारा दौऱ्यावर असून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यासाठी के 8 वाजता घरातून निघणार आहेत. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून ते नव्या पर्वाला सुरूवात करणार आहेत. राज्यात रविवारी घडलेल्या राजकीय घडामोडींवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, त्यांना सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता आहे.
महाराष्ट्राच्या जनतेवर पूर्ण विश्वास :शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. जो प्रकार घडला आहे, त्याची त्यांना चिंता नाही. उद्या सकाळी कराडला जाऊन यशवंतरावांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे. दुपारी रयत शिक्षण संस्थेची बैठक घेणार आहेत. मग दलित समाजाच्या एका मेळाव्याला ते उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर राज्यात आणि देशात जेवढे जाता येईल, जेवढे फिरता येईल, तेवढ ते करणार आहेत. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क वाढवणे, हाच या पाठीमागे एक हेतू आहे. हे सर्व संपवून ते मुंबईला जाणार आहे.
स्वातंत्र्य सैनिक ते पहिले मुख्यमंत्री-यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी भारताचे पाचवे उपपंतप्रधान देखील भूमिका बजाविली होती. यशवंतराव चव्हाण यांची ओळख काँग्रेसचे खंबीर नेते तसेच स्वातंत्र्यसैनिक, सहकारी नेते आणि समाजसेवक अशी होती. 'सामान्य माणसाचा नेता' म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळविली होती. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1914 रोजी, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना 1943 मध्ये 'भारत छोडो आंदोलनात अटक झाली होती.