पुणे :महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद ( Maharashtra Karnatak border dispute ) प्रकरणी कर्नाटक महामंडळाची एसटी अडवून निषेध करणाऱ्या दौंडमधील मराठा महासंघाच्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वक्तव्य केल्यानंतर दौंड शहरामध्ये मराठा महासंघाच्यावतीने कर्नाटक महामंडळाची एसटीवर जय महाराष्ट्र आणि जाहीर निषेध ( Jai Maharashtra Wrote On Karnatak ST ) असे आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे दौंडमधील आंदोलकांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( case filed against Maratha Federation protestors ) आहे.
Maharashtra Karnatak border dispute : कर्नाटकच्या एसटीवर जय महाराष्ट्र लिहून निषेध; मराठा महासंघाच्या आंदोलकांवर गुन्हा दाखल - Karnatak Corporation ST Stoped
दौंडमधील मराठा महासंघाच्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक महामंडळाची एसटीवर जय महाराष्ट्र आणि जाहीर निषेध ( Jai Maharashtra Wrote On Karnatak ST ) असे आंदोलन करण्यात आले होते.
एसटीवर जय महाराष्ट्र लिहून निषेध :मराठा महासंघाच्या दौंड शहरातील विक्रम पवार, शैलेंद्र दत्तात्रय पवार, दादा नांदखिले, अजिनाथ थोरात, रोहन घोरफडे, विकास जगदाळे आणि ईतर असे 5 ते 6 आंदोलकांनी एकत्र जमुन ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देवून एस. टी. बसचे समोरील काचेवर भगव्या रंगात ‘जय महाराष्ट्र’ असे लिहले आणि बाजुच्या पोपटी रंगावर काळया रंगाने जाहीर निषेध असे लिहून बेकायदा जमाव जमवून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करून जमाव बंदी आदेषाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला ( Karnatak Corporation ST Stoped ) आहे.