महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची छापेमारी.. बारामतीतील श्रायबर डायनामिक्स कंपनीत चौथ्या दिवशीही चौकशी सुरूच - आयकर विभागाची छापेमारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर आयकर विभागाकडून सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी सुरुच आहे. बारामतीमधील श्रायबर डायनामिक्स कंपनीत आयकर विभागाची कारवाई सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

income tax raids
income tax raids

By

Published : Oct 10, 2021, 3:07 PM IST

Updated : Oct 10, 2021, 3:15 PM IST

बारामती - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय आणि नातेवाईकांवर प्राप्तिकर विभागाची कारवाई सुरूच असल्याचे अद्यापही बोलले जात आहे. दरम्यान, बारामतीमधील श्रायबर डायनामिक्स कंपनीत आयकर विभागाची कारवाई सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची छापेमारी
गुरुवारी अजित पवार यांच्या नातेवाईक आणि निकटवर्तीय व्यक्तीवर प्राप्तीकर विभागाने छापेमारी करण्यास सुरुवात केली. ती अद्यापही सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, बारामतीमधील श्रायबर डायनामिक्स कंपनीत गुरुवारी प्राप्तिकर विभागाचे पथक आत गेले असून ते अद्यापही चौकशी करत असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. कंपनीच्या मुख्य गेटवर बंदूकधारी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले असून पत्रकारांना आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तर, आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर असून त्यांनी अद्यापही त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नसून प्राप्तिकरची कारवाई पूर्ण झाल्यास ते काही बोलणार का? याकडे सर्व राजकीय व्यक्तीचे डोळे लागलेले आहेत.

हे ही वाचा -सिद्धीविनायकाला म्हणालो.. बाप्पा लक्ष ठेव, माझ्यावर नाही तर लोकांवर; अजित पवारांची मिश्किल कोटी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर आयकर विभागाकडून सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी सुरुच आहे. अजित पवारांच्या सर्वात मोठ्या भगिनी, डॉक्टर रजनी इंदुलकर यांच्या बंगल्यामध्ये आयकर विभागाचे अधिकारी सलग तिसऱ्या दिवशी ठाण मांडून आहेत.

Last Updated : Oct 10, 2021, 3:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details