महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मावळमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड, राष्ट्रवादीचे सुनिल शेळके विजयी - मावळ सुनिल शेळके

मावळ विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. मात्र, या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल शेळके यांनी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचा पराभव केला. त्यामुळे, मावळमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पडले आहे.

Sunil Shelke Maval constituency

By

Published : Oct 25, 2019, 5:56 AM IST

पुणे- मावळ विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. मात्र, या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल शेळके यांनी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचा पराभव केला. त्यामुळे, मावळमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पडले आहे.

मावळमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड, राष्ट्रवादीचे सुनिल शेळके विजयी

गेल्या काही वर्षांपासून सुनिल शेळके यांनी मावळमध्ये स्वखर्चाने विकासकामे केली होती. तरीही, भाजपतर्फे त्यांना उमेदवारी न मिळता, भेगडेंना भाजपकडून उमेदवारी मिळाली. त्यानंतर बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेळके यांचा मानस होता. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली आणि इथला सामना रंगतदार बनला. विजयी उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

ABOUT THE AUTHOR

...view details