पुणे- भाजपने लोकसभेसाठी नुकतीच उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली. यामध्येही मित्रपक्षांना जागा सोडली नसल्याने रासपचे अध्यक्ष महादेव जानकर चांगलेच संतापले आहेत. भाजपच्या या वागणुकीने अस्वस्थ झालेल्या जानकर यांनी आज पुण्यात कार्यकर्त्यांनी बैठक बोलविली होती. यामध्ये त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत ३० ते ३५ उमेदवार उतरवण्याचा इशारा भाजपला दिला. तुमच्या बायकोला जर आमची बायको म्हणायचे असेल, तर लग्नच केले कशाला? असा संतप्त सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे.
रात्री दीड वाजता मुख्यमंत्र्याचा फोन आला. आता पण दोन वेळा आला. मी त्यांना म्हणालो, तुमचा मार्ग तुम्हाला लखलाभ असू द्या. आम्ही लढणार पण रासपच्या चिन्हावरच, एक नाही तर अनेक मुख्यमंत्री हा महादेव जानकर करणार असल्याचे जानकर म्हणाले. आता मंत्रीपद नको एकदा मांडवाखाली जाऊन आलो आहे. आता त्यांनी कोणालाही मंत्रीपद द्यावं, आम्ही रासपच्या चिन्हावर ३०-३५ जागा लढवणार, असा इशारा जानकर यांनी भाजपला दिला आहे.