महाराष्ट्र

maharashtra

महाडीबीटी पोर्टलला 11 जानेवारी 2021पर्यंत मुदतवाढ

By

Published : Jan 1, 2021, 5:15 PM IST

या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शेतकरी शेती निगडीत विविध बाबींसाठी यावर अर्ज करू शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.

baramati agriculture department news
कृषि विभागाचे महाडीबीटी पोर्टल

बारामती -कृषि विभागाने आता महाडीबीटी पोर्टलवर "शेतकरी योजना" या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरीता सर्व योजनांचा लाभ "एकाच अर्जाद्वारे" देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शेतकरी शेती निगडीत विविध बाबींसाठी यावर अर्ज करु शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.
महाडीबीटी पोर्टलचे संकेतस्थळ
महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील " शेतकरी योजना " हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. "वैयक्तिक लाभार्थी "म्हणून नोंदणी करु इच्छिणा-या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुन त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.
सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार
अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. पोर्टलवरील प्राप्त अर्जाची ऑनलाइन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.
शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी
महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करु शकतात. ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषि विषयक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी दिनांक ११/०१/२०२१ अखेर पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. या तारखेपर्यंत सर्व प्राप्त अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. तरी सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी, असे अवाहन तालुका कृषि अधिकारी बारामती दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details