पुणे - स्ट्रॉबेरी म्हटलं हे सगळ्यांना महाबळेश्वर आठवतं. ती लालचुटूक स्ट्रॉबेरी (Mahabaleshwar Strawberry farming) आणि महाबळेश्वरची थंडी हे कॉम्बिनेशन एकदम भन्नाट असतं. मात्र कोणाला सांगितलं की महाबळेश्वरची खासियत असलेली स्ट्रॉबेरी आता पुण्यात देखील (Strawberry farming in pune) पिकते. तर त्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे. पुणे शहराच्या जवळ मुळशी तालुक्यातील भूगाव येथे तब्बल साडेचार एकरमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे.
Strawberry In Pune : स्ट्रॉबेरीची शेतीचा 'मुळशी पॅटर्न'.. प्रगतशील शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग - महाबळेश्वर ची स्ट्रॉबेरी पुण्यात
स्ट्रॉबेरी म्हटलं हे सगळ्यांना महाबळेश्वर आठवतं. ती लालचुटूक स्ट्रॉबेरी आणि महाबळेश्वरची थंडी (Mahabaleshwar Strawberry farming) हे कॉम्बिनेशन एकदम भन्नाट असतं. मात्र कोणाला सांगितलं की महाबळेश्वरची खासियत असलेली स्ट्रॉबेरी आता पुण्यात देखील (Strawberry farming in pune ) पिकते. तर त्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे. पुणे शहराच्या जवळ मुळशी तालुक्यातील भूगाव येथे तब्बल साडेचार एकरमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे.
ही शेती भूगावचे माजी सरपंच व प्रगतशील शेतकरी मधुकर गावडे करत आहे. खरतर मुळशी हा तालुका भात शेतीसाठी अधिक प्रसिद्ध आहे. तरीही अशा ठिकाणी मधुकर गावडे यांनी स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि यात ते यशस्वी देखील झाले. यामध्ये त्यांना त्यांचा भाऊ अमोल सणस हे देखील मदत करतात. मधुकर गावडे फक्त शेती करून थांबले नाही. तर एक शेतकरी मार्केटिंगमध्ये देखील कशा पद्धतीने करू शकतो याचा उत्तम पायंडा देखील त्यांनी घालून दिला आहे. ते स्वतः या स्ट्रॉबेरीची मार्केटिंग व्यवस्थित उत्तमरीत्या करतात आणि त्यांना यात लाखोचा फायदा होतो. त्यांच्या या शेतीला पर्यटक देखील भेटी देतात.