पुणे- आज श्रावण मासातील दुसरा सोमवार आहे. या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे शंभू महादेवाच्या मंदिरात महाअभिषेक करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मंदिर बंद असले तरी पाच पुजाऱ्यांच्या उपस्थिततीत आज पहाटेची आरती करुन पूजा करण्यात आली.
पुणे जिल्हा प्रशासनाने कोरोना महामारीमुळे भीमाशंकर मंदिरात भाविकांसाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र दैनंदिन पूजेला परवानगी दिली आहे. या नियमांनुसार भीमाशंकर देवस्थानकडुन आज दुसऱ्या सोमवारी पूजा पार पडली. श्रावणी सोमवार असल्याने आज पूजेवेळी शिवलिंगाला तांदुळ व पाढ-या शुभ्र फुलांनी सजविण्यात आले होते. तर हर हर महादेव, ओम नम: शिवाय म्हणत महाअभिषेक घालण्यात आला.