महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विशेष पथकांचा दणका; अवैध दारू प्रकरणात 278 गुन्हे दाखल - पुणे ग्रामपंचायत निवडणूक न्यूज

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. जिल्ह्यात 746 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. तर 18 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Jan 8, 2021, 3:10 PM IST

पुणे-कोरोनाच्या संसर्ग कमी होत असतानाच जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा मद्यविक्री रोखण्यासाठी विशेष पथके नेमली आहेत. या पथकाने कारवाईचा दणका देत 278 गुन्हे दाखल केले. तर तब्बल 1 कोटी 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. जिल्ह्यात 746 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. तर 18 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे.

हेही वाचा-चोरांना पाहून पोलीस पळतात ही दुर्दैवी घटना- अजित पवार

अवैध मद्यविक्री प्रकरणात 167 जणांना अटक-

ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यापासून म्हणजेच 11 डिसेंबर 2020 ते 6 जानेवारी या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात धडक कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुणे जिल्ह्यातील ढाबे, रेस्टॉरंट व हॉटेल यांची तपासणी करण्यात आली आहे. या कारवाईत बेकायदा मद्यविक्री विक्री करणारे, भेसळयुक्त मद्य विक्री करणारे व ताडी विक्रेते अशाप्रकारचे 278 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 167 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 11 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत 1 कोटी 35 लाख 83 हजार 552 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ड्राय डेचे आदेश

हेही वाचा-मंचर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वळसे-आढळराव पाटील एकत्र; भाजपाने दिले आव्हान

तीन दिवस असणार ड्राय डे-

ग्रामपंचायत निवडणुकिसाठी मतदान 15 जानेवारीला होत असताना जिल्ह्यात तीन दिवस 'ड्राय डे' घोषित करण्यात आला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारी, त्यानंतर मतदानाचा दिवस 15 जानेवारी आणि निकालाचा दिवस 18 जानेवारी या तीन दिवशी मद्यविक्रीची दुकाने आणि बिअर बार बंद ठेवण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत निवडणूक नसलेल्या भागातील दुकाने आणि बिअर बार सुरू राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details