बारामती (पुणे)- माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत क्रिकेटचे सामने भरवण्यात आले होते. यावेळी राजकीय मैदानात सडेतोड टोलेबाजी करण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बॅट हाती घेऊन जोरदार फटकेबाजी केली.
शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन केले होते. सामान्य कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव होमग्राऊंड असलेल्या बारामतीमध्ये अजित पवारांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केली असल्याचे पाहावयास मिळाले.