पुणे- छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज शिव जन्मोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने आज सकाळी शिवाई देवीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत महाभिषेक करण्यात आला.
शिव जन्मोत्सव: किल्ले शिवनेरीवर शिवाई देवीला महाभिषेक
किल्ले शिवनेरी गडावरील शिवाई देवीचा महाअभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी शिवनेरी गडावर निघाली. यावेळी असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. किल्ले शिवनेरी गडावर शिव जन्मोत्सव साजरा होत असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी, शौचालय आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
किल्ले शिवनेरी गडावरील शिवाई देवीचा महाअभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी शिवनेरी गडावर निघाली. यावेळी असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. किल्ले शिवनेरी गडावर शिव जन्मोत्सव साजरा होत असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी, शौचालय आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवनेरी गडावर येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही यासाठी प्रशासनाकडून योग्य काळजी घेतली असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.
हेही वाचा-बारामतीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकतर्फी प्रेमातून केले गैरवर्तन