पुणे- सध्या कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरी, दरोडे, खून असे गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्यामध्ये सध्या कमालीची घट झाली आहे. तसेच पुढील काळात या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याचीही भीती असून त्यासाठी पोलिसांकडून आतापासूनच उपाययोजना करण्यात येत असल्याचे राजगुरुनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले.
पुण्याच्या ग्रामीण भागात गुन्ह्यांमध्ये कमालीची घट - पुणे लॉकडाऊन इफेक्ट ऑन क्राईम
कोरोनाच्या लढाईत पोलीस दिवसरात्र मेहनत घेऊन नाकाबंदी करत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना सध्या पोलिसांची धास्ती असल्याने गुन्ह्यांमध्ये घट होताना पाहायला मिळत आहे. मात्र, हिच परिस्थिती पुढील काळात अशीच राहिली तर गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसणार आहे.
कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी राज्यात चौथे लॉकडाऊन करण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बहुतांशी कुटुंब आपआपल्या घरात लॉकडाऊन आहे, आणि पोलिसांची जागोजागी नाकाबंदी आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये आपण पकडले जाऊ, ही भीती असल्याने चोरी, दरोडे, खून अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सध्या कमालीची घट झाली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण पुढील काळात अनेकांची आर्थिक स्थिती डासाळ्याची चिन्ह आहेत. त्यामुळे पुढील काळात चोरी, दरोडे अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची भीती आहे. मात्र, या गुन्ह्यावर वचक ठेवण्यासाठी राजगुरुनगर पोलिसांकडून आतापासून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या लढाईत पोलीस दिवसरात्र मेहनत घेऊन नाकाबंदी करत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना सध्या पोलिसांची धास्ती असल्याने गुन्ह्यांमध्ये घट होताना पहायला मिळत आहे. मात्र, हिच परिस्थिती पुढील काळात अशीच राहिली तर गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसणार आहे.