दौंड -तालुक्यातील कुसेगाव -सूप रोड फुईच्या घटातील कच्चा रोड नजीक कुसेगावच्या हद्दीत प्रेमी युगूलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेतील मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे.
दौंड तालुक्यातील कुसेगावजवळ प्रेमी युगूलाची आत्महत्या - प्रेमी युगूलाची आत्महत्या
दौंड तालुक्यातील कुसेगाव -सूप रोड फुईच्या घटातील कच्चा रोड नजीक कुसेगावच्या हद्दीत प्रेमी युगूलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

आत्महत्या
याबाबत मिळलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत दोघे ही दौंड तालुक्यातील आहेत. मुलगी पाटस येथील आहे तर मुलगा नानविज येथील आहे. पाटस पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार घनश्याम चव्हाणसह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली. दोघांनाही उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. याबाबत अधिक तपास पाटस पोलीस करीत आहेत.