पुणे - प्रेम प्रकरणातून प्रेयसीची हत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या भोसरीमध्ये घडली. सुमन चौहान (वय, २२) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. गळ्यावर चाकूने वार करून प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकराला भोसरी पोलिसांनी अटक केली. बरकत खलील (वय, २०) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. सुमनने आरोपी बरकत याला लग्नाला नकार दिला होता.
आरोपी बरकत आणि सुमन हे भोसरीमधील एकाच कंपनीत कामाला आहेत. मागील तीन महिन्यांपासून मृत सुमन त्या ठिकाणी काम करत होती. तीन दिवसांपूर्वीच सुमन तिचे मूळ गाव उत्तर प्रदेश येथून आली होती. तिचे लग्न होणार असल्याचे बरकत याला समजले. यानंतर बरकतने सुमनला लग्नासाठी विचारणा केली मात्र, सुमनने त्याला नकार दिला. त्यामुळे बरकतने सोबत असलेल्या चाकूने सुमनच्या गळ्यावर वार केले. यात सुमनचा जागीच मृत्यू झाला.