शिरुर (पुणे) - शिरुर शहराजवळील वाडा कॉलनी परिसरात चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकरानेच प्रेयसीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर प्रियकराने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत, प्रेयसीच्या हत्येची कबुली दिली. सारिका गिरमकर (30) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे.
चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीची निघृण हत्या; प्रियकराने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन दिली कबुली
शिरुर शहराजवळील वाडा कॉलनी परिसरात चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकरानेच प्रेयसीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर प्रियकराने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत, प्रेयसीच्या हत्येची कबुली दिली.
शिरुर येथील दत्तात्रय गायकवाड हा तरुण भाड्याच्या खोलीत राहत होता. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत तो काम करत आहे. दत्तात्रय याचे सारिकाबरोबर प्रेमसंबंध होते. मात्र, मागील काही दिवसांपासून दत्तात्रय हा सारिकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. अखेर या संशयातूनच त्याने प्रेयसीची हत्या केली. त्यानंतर दत्तात्रय कंपनीत कामाला निघून गेला आणि सकाळी स्वतःहून शिरूर पोलीस ठाण्यात हजर होऊन आपणच आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची कबुली दिली. या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर मुलीच्या हत्येप्रकरणी घरमालक यांच्या फिर्यादीनुसार दत्तात्रय गायकवाड यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास शिरुर पोलीस करत आहे.