पुणे : जिल्ह्यातील राजगुरुनगर शहराच्या लोकवस्तीच्या मध्यवर्ती व तहसीलदार कचेरीच्या आवारात असणाऱ्या वडाच्या व परिसरातील अनेक झाडांची छाटणी करण्यात आली. यामुळे अनेक पक्षांची घरटी जमिनीवर पडून लहान पिल्ले जखमी होऊन काहींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्राणीमित्र व मनसेच्या वतीने राजगुरुनगर नगरपरिषद व वनविभागाला जाब विचारत संताप व्यक्त केला आहे.
राजगुरुनगर : सरकारी कार्यालय परिसरातील झाडांची छाटणी बेतली पक्षांच्या जीवावर, ७० ते ८० पक्षांचा मृत्यू - wildlife rescue team pune news
राजगुरूनगर येथील शासकीय परिसरात करण्यात आलेली झाडांची छाटणी ही पक्षांच्या जीवावर बेतली आहे. या झाडांची छाटणी करत असताना अनेक पक्षांची घरटी उद्ध्वस्त होऊन 70 ते 80 पानकावळे, व बगळ्यांची पिल्ले मूत्यूमुखी पडले आहेत. तर बगळा व पानकावळा अशा 103 जिवंत पिलांना पुण्यामधील वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमच्या मदतीन उपचार देऊन जीवदान देण्यात आले असुन त्या पिल्लांना पुण्यातील सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.
पक्षांनी पावसाळ्याआधीच राहायची व्यवस्था व या काळात पक्षांच्या विणीच्या हंगामाचा काळ असल्याने आधीच 2 महिन्यापासून तहसील कार्यालय परिसरातील झाडांवर घरटी बांधलेली होती. या ठिकाणी पक्षाचा सहवास असल्याने पक्षांची विष्ठा पडत होती. यामुळे शासकीय कार्यालय परिसरात दुर्गंधी सुद्धा पसरली म्हणून या झाडांची छाटणी करण्यात आली आहे. या झाडांची छाटणी करत असताना अनेक पक्षांची घरटी उद्ध्वस्त होऊन 70 ते 80 पानकावळे, व बगळ्यांची पिल्ले मूत्यूमुखी पडले आहेत. तर बगळा व पानकावळा अशा 103 जिवंत पिलांना पुण्यामधील वाईल्डलाईफ रेस्क्यू टीमच्या मदतीन उपचार देऊन जीवदान देण्यात आले असुन त्या पिल्लांना पुण्यातील सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.
तहसिलदार कचेरी, पोस्ट ऑफिस, वनविभाग कार्यालय परिसरात या पक्षांमुळे दुरगंधी होत होती. मात्र, पक्षांच्या पिल्लांचा जन्म होण्याच्या वेळीच झाडांची छाटणी करण्यात आल्याने अनेक पक्षी भर पाऊसाळ्यात बेघर झाले असून पिल्लांचा मोठ्या संख्येने जीव गेला आहे. त्यामुळे तहसील कार्यालय, वनविभाग, नगरपरिषद कार्यालयांच्या आवारातच पक्षी सुरक्षीत नाही त्यामुळे दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी प्राणीमित्र व मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.